Latest Marathi News

BREAKING NEWS

लक्ष्मीच्या पावलांनी भाड्याच्या खोलीत आलीस ….. लग्नाच्या वाढदिवसादिवशी कुशल बद्रिकेची बायकोसाठी खास पोस्ट

0 446

‘ या लोकप्रिय शोमधून सर्वांना खळखळून हसवणारा कलाकार अभिनेता कुशल बद्रिके सध्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला आहे. दिग्दर्शक संजय जाधवच्या सिनेमात कुशलची वर्णी लागली आहे. यामध्ये प्रार्थना बेहेरे, अभिनय बेर्डे, शिवानी सुर्वे यांची देखील मुख्य भूमिका आहे. तर आज कुशलच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याने बायकोसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

कुशल लिहितो,
मला चहा खूप आवडतो आणि मी तो पितो ही खूप. म्हणूनच कदाचित आपल्या लग्नाआधी काही नातेवाईक, माझ्याबद्दल “तुला” म्हणाले होते.

Manganga

तरीही चहाच्या टपरीवरच्या भेटीपासून, ते लग्नाच्या गाठी पर्यंतचा आपला प्रवास झालाच.
तू लक्ष्मीच्या पावलांनी, “भाड्याच्या खोलीत” आलीस आणि नटराजाच्या पावलांनी “स्वतःच्या घरात” नाचू लागलीस. आता आपल्या घरात चहापाण्याला आलेल्या नातेवाईकांसोबत तू बसतेस आणि बऱ्याचदा त्यांना coffee पाजतेस बहुतेक तुलाही पटले आहे.

बघ, संपल्यावरही रेंगाळून राहीन “चवीसारखा”, तुझ्या आयुष्यात. एक गोड आठवण बनुन…….
Happy marriage anniversary yaar
सुकून

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!