Latest Marathi News

BREAKING NEWS

मे, जून या २ महिन्यात तब्बल २४ मुहूर्त; लग्नासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना दिलासा

0 208

मुंबई : मार्च, एप्रिल महिन्यात एकही विवाह मुहूर्त नसल्याने अनेक इच्छुक जोडप्यांची लग्न खोळंबली होती. मात्र या जोडप्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मे, जूनमध्ये लग्नाचा बार उडवता येणार आहे. पुढच्या दोन महिन्यांत तब्बल २४ मुहूर्त आहेत. या वर्षी लग्नासाठी जानेवारी, फेब्रुवारी नंतर थेट मे, जून महिन्यात मुहूर्त आहेत.

मार्च महिन्यात बोटावर मोजण्या इतकेच तर एप्रिलमध्ये एकही मुहूर्त नसल्याने अनेक लग्न खोळंबली होती. मात्र मे, जूनमध्ये बरेच मुहूर्त असल्याने लग्नासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना दिलासा मिळाला आहे.

Manganga

मार्च, एप्रिल या दीड महिन्यात एकही मुहूर्त नसल्याने विवाह इच्छुक जोडप्यांची पुढील नियोजन रखडली. याचा फटका केटरिंग तसेच मंगल कार्यालयांनाही बसला.

 

विवाह सोहळा दणक्यात साजरा करताना बँड बाजा, डीजेची ऑर्डर दिली जाते. त्यासाठी आतापासून लगबग सुरू झाली आहे. याशिवाय केटरिंगची जुळवाजुळव करावी लागत आहे.
२०२३ मध्ये हे आहेत लग्नाचे मुहूर्त
जानेवारी : १५, १६, १८, १९, २५, २६, २७, ३०, ३१
फेब्रुवारी : ६, ७, ८, ९, १०, १२, १३, १४, १५, १७, २२, २३, २८
मार्च : १, ५, ६, ९, ११, १३
मे : ६, ८, ९, १०, ११, १५, १६, २०, २१, २२, २७, २९, ३०
जून : १, ३,५, ६, ७, ११, १२, २३, २४, २६, २७
नोव्हेंबर : २३, २४, २७, २८, २९
डिसेंबर : ५, ६, ७, ८, ९, ११, १५

 

त्याचबरोबर दीड महिने लग्नाचे मुहूर्त नसल्याने मे, जूनमध्ये मंगल कार्यालयांची बुकिंग यापूर्वीच सुरू झाली आहे. अनेक लग्न खोळंबल्याने बुकिंग जोरात सुरू आहे. अनेकांना तर हॉलही मिळेनासे झाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!