Latest Marathi News

BREAKING NEWS

Video : ‘बहरला हा मधुमास’ गाणं ; समीर चौघुलेंचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

0 1,255

‘महाराष्ट्र शाहीर’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट २८ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदेंनी केलं आहे. टीझर व ट्रेलरप्रमाणेच या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली.

‘महाराष्ट्र शाहीर’च्या प्रमोशनकरिता चित्रपटाच्या टीमने अनेक ठिकाणी हजेरी लावली होती. लोकप्रिय टीव्ही शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्येही महाराष्ट्र शाहीरची टीम आली होती. यावेळी हास्यजत्रेतील विनोदवीरांनी स्पेशल स्किट सादर केलं. समीर चौघुले, चेतना भट व ओंकार राऊत यांच्या या स्किटने प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडलं.

Manganga

चेतनाने या स्किटमध्ये ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील लोकप्रिय ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं गायलं. तर समीर चौघुलेंनी या गाण्यावर ऑन स्टेजच ठेका धरला. चौघुलेंनी ‘बहरला हा मधुमास’ गाण्याच्या हुक स्टेप्स करत स्किटमध्ये रंगत आणली. समीर चौघुलेंचा डान्स पाहून सगळ्यांनाच हसू अनावर होत आहे.

पहा व्हिडीओ

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!