भर रस्त्यात नवरदेवाच्या गाडीतून उतरून नवरीने अपहरण झाल्याचं सांगत आरडाओरड! नवरदेवाला नवरीशिवाय परतावं लागलं घरी
बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात भर रस्त्यात नवरदेवाच्या गाडीतून उतरून नवरीने अपहरण झाल्याचं सांगत आरडाओरड केली त्यामुळे एकच खळबळ उडाली. नवरीने आरडाओरड केल्याने रस्त्यावर मोठा गोंधळ झाला. अपहरणाचं ऐकून लोकांची मोठी गर्दी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना समस्तीपूर रोसडा मुख्य रस्त्यावरील आहे. गेल्या रात्री एक वरात अंगारघाटहून डिहुली गावात आली होती. इथे रितीरिवाजानुसार नवरी-नवरदेवाचं लग्न झालं आणि सकाळी नवरदेव नवरीला घेऊन परत जात होता.

यानंतर नवरी गाडीतून खाली उतरली आणि तिने तिचं अपहरण होत असल्याचं सांगत आरडाओरड सुरू केली. हे बघून नवरदेवाकडील लोक हैराण झाले. आरडाओरड ऐकून लोकांनी तिथे गर्दी केली. बराच वेळी रोडवर हा ड्रामा सुरू होता.
दरम्यान, नवरी तिच्या लहान भावासोबत एका बाइकवर बसली आणि नवरदेवाला तिथेच सोडून फरार झाली. नवरी म्हणाली की, तिच्या लहान भावाला उलटी होत होती. नवरदेवाला मोबाइल मागितला तर त्याने दिला नाही.
यावर नवरदेव म्हणाला होता की, नवरी म्हणाली होती की, तिच्या लहान भावाला उलटी होत आहे, तर मी गाडी थांबवली. त्यानंतर ती अपहरणाचा आरोप करू लागली होती. या घटनेनंतर नवरदेव नवरीशिवायच आपल्या घरी परतला.