बीड : जिल्ह्यातील ९ पैकी सहा बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान झाले. यातील वडवणी बाजार समितीवर राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांचे वर्चस्व राहिले. यात बीडमध्ये आ.संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना इतर पक्षांच्या मदतीने मात दिली.
परळीमध्ये आ.धनंजय मुंडे यांच्या पॅनलला आघाडी असून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पॅनल मागे असल्याचे सांगण्यात आले. गेवराईत पुन्हा एकदा माजी आ.अमरसिंह पंडित यांनी गड कायम राखला. अंबाजोगाईतही आ.धनंजय मुंडे गटाचे वर्चस्व राहिले. १८ पैकी १५ जागा महाविकास आघाडीच्या तर तीन जागा भाजपच्या आल्या.

भाजप नेते रमेश आडसकर व आ.नमिता मुंदडा गटाचे १४ उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांचे चार उमेदवार निवडूण आले. आतापर्यंत तरी वडवणी, अंबाजोगाई, गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीला इतर पक्षांनी साथ दिली असून केजमध्ये भाजपचे वर्चस्व राहिले आहे. परळीतील अंतिम निकाल येणे बाकी असून अद्यापही मतमोजणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.