विटा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सत्ताधारी गटाचे सर्व उमेदवार विजयी : राष्ट्रवादीचा झाला करेक्ट कार्यक्रम
माणदेश एक्सप्रेस न्युज : विटा : विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज झालेल्या मतमोजणी मध्ये सत्ताधारी गटाचे सर्व १८ उमेदवार विजयी झाले आहेत.
विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता विटा येथे सुरुवात झाली. विटा बाजार समितीसाठी चुरशीने ९१.३० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे आज होणाऱ्या निकालाकडे लक्ष लागले होते. परंतु अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी गटाने यामध्ये बाजी मारत सर्वच्या सर्व १८ उमेदवार विजयी झाले.

विटा बाजार समितीची निवडणूक ही सत्ताधारी आम. अनिलभाऊ बाबर यांनी इतर पक्षाची आघाडी करत लढविली होती. यामध्ये काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) व भाजप गट यांनी एकत्रपणे निवडणूक लढविली. तर विरोधात माजी आमदार सदाशिव पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, सुशांत देवकर, सचिन शिंदे, राजेंद्र माने, किसन जानकर यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु त्यांचा यामध्ये पराभव झाला.