Latest Marathi News

BREAKING NEWS

पतीने ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास नकार दिल्याने गळफास घेऊन पत्नीने संपवले जीवन

0 429

मध्य प्रदेश:   इंदूरमधून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीला ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी नकार दिल्याने ती संतापली. तिला एवढा राग आला की तिने आत्महत्याच केली.

ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथील एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथील रहिवासी बलराम यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. बलराम आणि त्यांची पत्नी रीना यांच्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत. त्यांच्या पत्नीला ब्युटी पार्लरमध्ये जायचे होते. मात्र, काही कारणास्तव, त्यानी तिला ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास नकार दिला होता. यामुळे त्याची पत्नी संतापली आणि तिने रागाच्या भरात गळफास घेतला.

Manganga

 

बलराम यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी त्याच्यासोबत भांडत होती. मात्र बलराम यांनी ब्युटी पार्लरमध्ये जाण्यासाठी नकार दिल्याने तिने गळफास घेत आत्महत्या केली.

 

यानंतर घटनेचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांना शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बराच वेळ दरवाजा न उघडल्याने बलराम यांनी आत डोकावून पाहिले तर त्यांना धक्काच बसला. त्यांना पत्नी फासावर लटकलेली दिसली. यानंतर त्यांनी दरवाजा तोडून तिला खाली उतरवले. तोवर सर्वकाही संपले होते. तपास अधिकाऱ्यानी म्हटले आहे, पती आणि पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून बलराम यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!