Latest Marathi News

BREAKING NEWS

आश्चर्य चकित: सीट बेल्ट लावून कारमध्ये बसले गायीचं वासरू;व्हिडीओ पहा…

0 138

 

माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशी नातेसंबंध जोडत असतो. ज्यांच्या घरात पाळीव प्राणी असेल, तर तो त्या कुटुंबाचा एक सदस्यच होतो. घरातील एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे जिव्हाळा लावला जातो, प्रेम दिले जाते.

Manganga

त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यावर प्रेम केले जाते. काही हौशी लोक प्राण्यांसाठी कितीही तडजोडी करायला तयार असतात. वेळात वेळ काढून जमेल तसं ते प्राण्यांची काळजी घेतातच. त्यामुळे या प्राण्यांचं खाणं, पिणं, झोपणं, फिरणं हे सुद्धा त्या मालकाबरोबरच असते.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कार चालवत असताना एका महिलेनं तिच्या बाजूच्या सीटवर चक्क गायीच्या वासरला बसवलं आहे.

एवढचं नाही तर, या वासराला सीट बेल्टही लावला आहे. हे वासरुही अगदी शांतपणे सीटवर बसलेलं आहे. रस्त्यावरील आजूबाजूचे लोकही या वासराला कारमध्ये बघून शॉक झाले आहेत. पांढरं शुभ्र वासरु या व्हिडीओमध्ये अतिशय गोंडस दिसतं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!