माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : खरेदी केलेल्या जागेची नोंद ७/१२ पत्रकी लावण्याकरता १० हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्यास रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक पडकले.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार याचा मित्र निखील आठवले याचे आजोबा (आईचे वडील) गुलाब सुदाम गाडे यांनी सन १९९२ मध्ये गुंठेवारी मधील सध्याचे अजिक्यनगर कुपवाड येथील घरजागा गट नंबर ३३१/४ ही बबर काळु परीट जमदाडे यांचेकडुन खरेदी पत्र करुन घेतलेली आहे. सदर जागेचे महानगरपालिकेचे गुंठेवारी प्रमाणपत्र घेतलेले आहे. परंतु जागेच्या ७/१२ उता-याला नावे लावलेली नसल्याने ७/१२ उता-याला नावे लावणे करिता कुपवाड तलाठी कार्यालय येथे अर्ज दिला होता सदर नोंद ही जुनी असलेने त्याची नोंद ७/१२ सदरी घालणे करिता तलाठी कुपवाड सचिन इंगोले यांनी तक्रारदार यांचेकडे १०,०००/- रु लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यावेळी पथकाने पडताळणी केली असता केली असता सदर पडताळणी मध्ये लोकसेवक तलाठी कुपवाड सचिन इंगोले यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या मित्राचे कामा करिता १०,०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानंतर दि.२८/०४/२०२३ रोजी तलाठी कार्यालय कुपवाड या ठिकाणी लोकसेवक तलाठी कुपवाड सचिन इंगोले यांचे विरूध्द सापळा कारवाई आयोजीत केली असता सापळा कारवाई वेळी लोकसेवक तलाठी कुपवाड सचिन इंगोले यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे मित्राचे कामा करिता लाचेची मागणी करून १०,०००/- रूपये तक्रारदार यांचेकडून स्विकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने सचिन प्रल्हाद इंगोले वय-३८ वर्षे,तलाठी कुपवाड रा.विजयनगर कुपवाड रोड, कृष्णकुंज अपार्टमेंट, फ्लॅट नं १०४ सांगली यांचे विरुध्द कुपवाड ‘एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अमोल तांबे सो पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, श्री. सुरज गुरव ‘सो,अपर पोलीस उप आयुक््ता/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संदीप पाटील, पोलीस उप अधीक्षक, श्री.विनायक भिलारे पोलीस निरीक्षक, श्री.दत्तात्रय पुजारी पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार क्रषिकेश बडणीकर, अजित पाटील, सलीम मकानदार, रविंद्र धुमाळ, चंद्रकांत जाधव राधिका माने, चालक अनिस वंटमुरे यांनी केली आहे.