Latest Marathi News

BREAKING NEWS

 

सांगली जिल्हा बँकेत बनावट सोने तारण ठेऊन २५ लाखांना फसवले : सराफासह आठ जणावर गुन्हा दाखल

0 1,335

सांगली : जत तालुक्यातील सोरडी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत बनावट सोने देऊन शाखेला २५ लाख ७३ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सात कर्जदार व सराफ (व्हॅल्युशनर) अशा आठ जणांवर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात जिल्हा बँकेचे जत मार्केट यार्ड शाखेतील तालुका विभागीय अधिकारी राजेंद्र नाटेकर यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

 

गुन्हा दाखल झालेल्या मध्ये शहाजी मारुती तुराई (रा. राजोबावाडी), अस्लम अमिन मुलाणी ,धनाजी भिमराव पुजारी , अंकुश सदाशिव मलमे तिघे (रा. दरीकोणुर), धोंडाप्पा भिमराम गावडे, आशाबाई आप्पासाहेब टेंगले, माय्याका भिवा गावडे तिघे (रा. सोरडी) संजय विठ्ठल सावंत (रा. माडग्याळ ) असे सराफ सह एकूण आठ जणावर जत पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दिनांक 26 ऑक्टोंबर 2022 ते 13. एप्रिल 2023 दरम्यान सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा सोरडी येथे सोने कर्ज खातेदार शहाजी मारुती तुराई, अस्लम अमिन मुलाणी, धोंडाप्पा भिमराम गावडे, आशाबाई आप्पासाहेब टेंगले, धनाजी भिमराव पुजारी, अंकुश सदाशिव मलमे, माय्याका भिवा गावडे यांनी व्हॅल्युशनर सावंत यांच्याशी संगनमत करून बँकेत बनावट १७ सोन्याचे जिन्नस ठेवून त्या तारणावर एकूण कर्ज रक्कम २५ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.