Latest Marathi News

BREAKING NEWS

“मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं”, ‘त्या’ फलकबाजीवरून “या” केंद्रीय मंत्र्याचा राष्ट्रवादीला टोला

0 149

सांगली : मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे अशा शब्दात राज्यात सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवरून केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला टोला लगावला.

सांगली दौर्यांवर आलेल्या केंद्रिय राज्यमंत्री आठवले यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भावी मुख्यमंत्री म्हणून होत असलेली फलकबाजी हास्यास्पद असून मलाही मुख्यमंत्री व्हावे असे वाटते, मात्र, त्यासाठी आपली ताकद असेल तरच हे शक्य आहे.

Manganga

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आल्याचे सांगितले आहे. त्यांनी आता ठोस निर्णय घेउन एनडीएसोबत यायला हवे. ते जेष्ठ व अनुभवी नेते आहेत. मी आता एनडीएसोबत आहे, मग पवार यांनीही यायला हरकत कसली? त्यांनीच आता ठोस भूमिका घ्यावी असे ते म्हणाले. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, माजी महापौर विवेक कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या सह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!