सांगली : शिराळा तालुक्यातील मणदुर येथे वारणा डावा कालव्याच्या बाजुस असणार्याभ काळम्मा देवीच्या मंदीर परीसरात शुक्रवारी सकाळी च्या सुमारास शेतकऱ्यावर गव्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शेतकरी अशोक विष्णु सोनार (वय ६२) हे सकाळ च्या सुमरास शेतात गेले होते. यावेळी ते वारणा डावा कालव्याच्या शेजारी असलेल्या काळम्मा देवीच्या मंदिरा परिसरात आले असता यावेळी गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. गव्याने सोनार यांना कालव्याच्या बाजुला असणार्यात रस्त्यावर फेकुन दिले. शेजारीच शेतात काम करत असलेल्या शेतकर्यां नी आरडाओरडा केल्याने गवा डोंगराच्या दिशेने पळुन गेला.

वनविभागाच्या कर्मचारी यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत याची माहीती वरीष्ठांना दिली. जखमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.