Latest Marathi News

BREAKING NEWS

आता खुपणार नाही तर टोचणार ! : ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0 332

झी मराठीने ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अवधूत गुप्ते त्याच्या स्टाईलमध्ये म्हणत आहे की, प्रश्नांची धार वाढणार…आता खुपणार नाही तर टोचणार…’खुपते तिथे गुप्ते’ लवकरच”. अवधूतनेदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,”खुप्ते तिथे गुप्ते लवकरच…पुन्हा घेऊन येतोय तुमच्या भेटीला”.

‘खुपते तिथे गुप्ते’ प्रेक्षकांचा आवडता, जबरदस्त आणि अफलातून कार्यक्रम 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत असल्याने पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांनी गुपिते उलगडली जाणार आहेत.

Manganga

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधूत गुप्ते खुपणारी गोष्ट बेमालूमपणे व खुबीने समोर आणणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’चं हे पर्व वेगळं असणार आहे. या पर्वाचं खास आकर्षण एक खास खुर्ची असणार आहे. या खुर्चीसाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळणार आहे. नोकरदार, कॉर्पोरेट आणि राजकारणी मंडळींमध्ये खुर्चीसाठीची ही चढाओढ पाहायला मिळणार आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!