Latest Marathi News

BREAKING NEWS

जिया खान आत्महत्या प्रकरणात “या” अभिनेत्याची निर्दोष मुक्तता : विशेष सीबीआय न्यायालयाने दिला निर्णय

0 272

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणावर आज विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पार पडली. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीवर ठेवण्यात आला होता. आज कोर्टाने याप्रकरणी निकाल दिला असून सर्व आरोपांतून सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

जिया खान आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती. २० एप्रिल रोजी न्यायाधीश एएस सय्यद यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेत अंतिम निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी आज न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. तब्बल १० वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून अभिनेता सूरज पांचोलीची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Manganga

पुराव्यांअभावी सूरज दोषी नसल्याचं सिद्ध झालंय, असं विशेष सीबीआय न्यायालयाने निर्णय सुनावताना सांगितलं. विशेष न्यायाधीश एएस सय्यद यांनी या खटल्यातील पुराव्यांचा अभाव लक्षात घेऊन हा निकाल दिला. या प्रकरणात सीबीआयने हस्तक्षेप केला होता. आता एका दशकानंतर कोर्टात सुनावणी पार पडली व सूरज पांचोलीची सर्व आरोपांमधून मुक्तता करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!