Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीटीची शक्यता; “या” जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

0 1,868

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. एकीकडे अवकाळीचं संकट पाठ कधी सोडणार? याची वाट बळीराजा पाहत असताना दुसरीकडे चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असून, वादळी पाऊस हजेरी लावणार आहे. पश्‍चिम विदर्भापासून, मराठवाडा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसाची स्थिती कायम असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Manganga

हवामान खात्याने शुक्रवारी (२८ एप्रिल) मराठवाडा, विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे आधीच अवकाळीची धास्ती धरून बसलेल्या शेतकऱ्यांचं आणखीच टेन्शन वाढणार आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात कमाल व किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील बीड, नांदेड, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, भंडारा, गोंदिया. अवकाळी पाऊसासह जोरदार गाटपीट होण्याची शक्यता आहे.

तर, दुसरीकडे पुण्यासह सातारा, सांगली, नाशिक, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलडाणा, गडचिरोली, धाराशिव, अकोला, वर्धा या १७ जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!