Latest Marathi News

BREAKING NEWS

दुर्दैवी घटना : वादळी वाऱ्याने ट्रक उलटला : ट्रकखाली दबल्याने अभियंत्यासह दोघांचा मृत्यू

0 868

जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे आज गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे उभा असलेला ट्रक उलटून त्याखाली दबल्याने अभियंत्यासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर आहे.

चिंचोली गावानजीक नवीन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाचा ठेका पुणे येथील न्याती कन्स्ट्रक्शनला देण्यात आला आहे. बांधकामासाठी बिहारमधील काही मजूर आले आहेत. गुरुवारी दुपारी वादळी वारा वाहू लागल्याने वादळापासून जीव वाचविण्यासाठी मजुरांनी पत्र्याच्या शेडचा आसरा घेतला. वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने पत्र्याचे शेड उडाले. त्यामुळे शेडमधील मजूर तेथे उभ्या असलेल्या वाहनाच्या आडोशाला गेले.

Manganga

मात्र, वादळी वाऱ्याने वाहनही उलटले. त्याखाली भोला पटेल (रा. सानिकावा, बिहार) आणि चंद्रकांत वाभळे (५२, रा. चाळीसगाव, सध्या पुणे) हे दाबले गेले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अफरोज आलम (२३, रा. कुंडाळे, बिहार) हा जखमी झाला. जखमीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. क्रेनद्वारे वाहन बाजूला करुन दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!