सुदानमध्ये अडकलेल्या सांगलीकरांसाठी जयंत पाटील सरसावले : परराष्ट्र मंत्र्यांकडे ट्वीटद्वारे केली मागणी
सांगली : सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरिक सुदानमध्ये अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील सरसावले आहेत. या नागरिकांना परत आणण्यासाठी लक्ष देऊन योग्य पावले उचलण्याची मागणी जयंत पाटील यांनी परराष्ट्र मंत्र्यांकडे ट्वीटद्वारे केली आहे.
सुदानमध्ये सुरु असलेल्या देशातंर्गत युध्दामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरिक अडकले आहेत. भारतीय दूतावासाने अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणापासून सुमारे १२०० किलोमीटरवर हे नागरीक आहेत. परराष्ट्र खात्याकडून ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जात आहे. आतापर्यंत काही भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
.@DrSJaishankar ji,I am seeking your assistance to bring back 100 citizens from my home district of Sangli,MH.They are currently stranded in Sudan due to the ongoing war.They are currently 1200kms from the closest IAF Operations. Request you to intervene & help them. @PawarSpeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 27, 2023