जत : जत शहरातील जत-विजापूर रस्त्यावर डॉ. तांबोळी यांच्या हॉस्पिटलसमोर मॉर्निंग वॉकला गेलेल्या दांपत्याला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने पती जागीच ठार झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सतीश गेनाप्पा शिंदे,( वय ३२) रा. सातारा रोड, जत असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याची पत्नी गंभीरित्या जखमी झाली आहे. गुरुवार दि. 27 एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
गुरुवार सकाळी साडेपाचच्या सुमारास सतीश शिंदे व त्याची पत्नी हे विजापूर रोड वरून मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. परत येत असताना या दांपत्याला विजापूर होऊन साताऱ्याकडे निघालेल्या भरघाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या दोघांनाही रस्त्यावरून फरपटत पुढे नेले. कंटेनरची जोराची धडक बसल्यामुळे सतीश हा जागीच ठार झाला. तर त्याची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आशीर्वाद ड्रायक्लीनर्स नावाचे इस्त्री व ड्रायक्लीनचे दुकान आहे. या घटनेमूळे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.