तुम्ही अनेकदा आई-वडिलांसोबत एक किंवा दोन मुले बाईकवर बसून बाईक चालवताना पाहिली असतील. पण व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एक-दोन नव्हे तर नऊ मुलांना आपल्यासोबत बसवले आहे. यासाठी या व्यक्तीने असा देशी जुगाड वापरला आहे की जो पाहून तुम्ही थक्क व्हाल.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती 9 मुलांना बाईकवर बसविण्याचा प्रयत्न करत आहे. या व्यक्तीने त्याच्या पुढे पॅट्रोलच्या टाकीवर, हँडलपर्यंत ४ मुलांना बसवले आहे. एवढेच नव्हे तर पुढच्या चाकावरही एक मुलगी उलटी बसल्याचे दिसते आहे. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीच्या मागच्या बाजूला ३ मुली बसल्या आहेत. तरीही एक व्यक्तीसाठी जागा त्यांना कमी पडते.

मग काय मागच्या बाजूच्या ३ मुली उतरतात एक फळी गाडी चालवणाऱ्याच्या खाली सीटवर ठेवतात जी गाडीच्या मागे जास्त जागा तयार करते. मग चारही मुली त्या फळीवर बसताना दिसत आहे. हा जुगाडचा पाहून तुम्हीही म्हणाल की, ”हे फक्त भारतातच घडू शकते.”
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा ट्रेंडिंग व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला आणि शेअर केला जात आहे.