Latest Marathi News

BREAKING NEWS

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या ट्रेनमधून पडणाऱ्या वृद्धाला महिला जवानाने वाचवले! व्हिडीओ पहा…

0 832

रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढताना ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो. मात्र, प्रवाशांना वाचवण्यासाठी रेल्वे सुरक्षा कर्मचारी प्लॅटफॉर्मवर तैनात असतात. भारतीय रेल्वे नेहमी सर्व प्रवाशांना सल्ला देते की कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. मात्र तरीही प्रवाशी या नियमांकडे दुर्लक्ष करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात.

वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महाग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. कधी कधी ते मोठ्या अपघाताला बळी पडतात आणि मृत्यूही पत्करतात. सध्या अशीच एक रेल्वे स्थानकावरील घटना समोर आली आहे .

Manganga

एक वृद्ध व्यक्ती ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वृद्धाला ट्रेन पकडता येत नाही आणि तो खाली कोसळतो. तो ट्रेनखाली जाणार तेवढ्यात एक महिला आरपीएफ कॉन्स्टेबल धावत येते आणि त्याला ओढते.

ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!