सोशल मिडिया जेवढा चांगला तेवढाच अनुभव वाईट याचा प्रत्यय सध्या भाजपच्या आमदारला आला आहे. कारण कर्मचाऱ्याने कामाचे पैसे मागणी केल्यानंतर त्याला काठीने मारहाण केली असून सदरचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणत व्हायरल होत असून उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंट वरून तो शेअर करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील भाजप पक्षाची युती असणारे निर्बल इंडियन शोशित हमारा आम दल पक्षाचे विपुल दुबे हे ज्ञानपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. त्यांच्या कडे कामाला असणाऱ्या व्यक्तीने त्यांना कामाचे पैसे मागितल्यानंतर या आमदारांनी त्या कर्मचाऱ्याला काठीने बेदम मारहाण केली आहे. तसेच त्या व्यक्तीला मारहाण केल्यानंतर कोंबडा बनण्यास संगितले असून त्यानंतर हि त्याला मारहाण केली आहे.

याबाबतची व्हिडीओ सोशल मिडियामध्ये मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला असून उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत सोशल मिडिया वरून सदरचा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, गरिबांच्यावर अन्याय करणारी भाजपची वर्तणूक झाली असल्याची टीका करण्यात आली आहे.