Latest Marathi News

BREAKING NEWS

आठवीमध्ये शिकत असणाऱ्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू

0 68

पुणे: वेळवंडी नदीवर येसाजी कंक जलाशयात पोहण्यासाठी आलेल्या रुद्र राहुल शलिंदर (वय १६) (सध्या रा. भोलावडे मूळ रा. साप्रज खडकी पुणे) या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बसरापूर ( ता. भोर ) येथे घडली. मात्र बुडालेल्या मुलाचा मृतदेह अद्याप मिळाला नसून युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे.

 

रूद्र आणि त्याचा मावसभाऊ पोहण्यासाठी आले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

Manganga

घटनास्थळी भोर तहसीलदार सचिन पाटील, सर्कल धर्माकांबळे, पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, उद्धव गायकवाड, विकास लगस, दत्तात्रय खेंगरे, सहकारी व भोईराज रेस्क्यू जल आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी, बसरापूरचे पोलिस पाटील विठ्ठल झांजले, भोलावडे सरपंच प्रवीण जगदाळे, माजी सरपंच सूर्यकांत बदक, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र झांजले, पोलिस मित्र केशव साळुंखे व ग्रामस्थ दाखल झाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!