आटपाडी तालुक्यातील “या” नवीन वीज उपकेंद्राची कामे प्रगतीपथावर, काही उपकेंद्रांची निविदा प्रक्रिया सुरु
आटपाडी : आटपाडी तालुक्यात नवीन उपकेंद्रे व उपकेंद्रांची क्षमता वाढीची कामे केली जाणार आहेत. यामुळे आगामी काळात शेतीचा वीज पुरवठा काहीसा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
घरनिकी, शेटफळे, या नवीन उपकेंद्रांची कामे प्रगतीपथावर आहेत. तर दिघंची, हिवतड या नवीन उपकेंद्रांच्या उभारणीची प्रक्रिया सुरु आहे. तर लिंगीवरे या उपकेंद्रांच्या क्षमता वाढीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

निंबवडे, या नवीन उपकेंद्रांच्या उभारणीसाठी 5 एमव्हीए क्षमता वाढीसाठी प्रस्ताव मंजुरीची अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आगामी काळात शेती पंपाला वीज मिळणार असल्याने आटपाडी तालूक्यात येथून पुढे शेती पिकामध्ये मोठ्या प्रमाणत वाढ होणार असल्याने याचा मोठा फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे. (स्त्रोत-पुढारी)