Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आटपाडीच्या तहसीलदार यांची बदनामी : माहिती अधिकार कार्यकर्त्यासह एकावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल

0 2,822

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडीच्या तहसीलदार श्रीमती बी.एस. माने यांना त्यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप द्वारे त्यांची बदनामी करून अश्लील मेसज टाकून बदनामी केल्या प्रकरणी स्वत:ला माहिती अधिकार कार्यकर्त्या समजणाऱ्यासह एकावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, श्रीमती बाई माने ह्या आटपाडी तालुक्याच्या तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. यातील आरोपी विजय श्रीरंग यादव रा. मुंबई व आरोपी जितेंद्र आशिक मंडले रा. शिरढोण ता. कवठेमहांकाळ यांनी फिर्यादी श्रीमती बाई माने यांच्या मोबाईल वर व्हाटसअपच्या माध्यमातून अवैध वाळू वाहतुकीवर करीत असलेल्या कारवाईस अटकाव करण्याचे उद्देशाने अश्लील बदनामकारक मजकूर टाकून त्यांची बदनामी केली.

याप्रकरणी आरोपी वर आटपाडी पोलिसात तहसीलदार यांच्या फिर्यादीनुसार कलम ३५४ अ), ५०९, ३८५, १८६, ३४, तसेच माहिती व तंत्रज्ञान कलम ६७, ६७ (अ), ८४ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.