Latest Marathi News

BREAKING NEWS

मालमत्तेची कागदपत्रे हरवली तरी काळजी करू नका; डुप्लिकेट डॉक्युमेंट कशी मिळवायची? जाणून घ्या सविस्तर

0 434

नवी दिल्ली : मालमत्तेच्या बाबतीत प्रत्येकजण खूप सावध असतो. पण असे असतानाही काही वेळा काही समस्या निर्माण होतात. मालमत्तेची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी लोक बँक लॉकरचा अवलंब करतात. ही कागदपत्रे अत्यंत आवश्यक असतात, कारण त्याशिवाय तुम्ही भविष्यात तुमची मालमत्ता विकू शकणार नाही. मग मालमत्तेची कागदपत्रे कोणत्याही कारणाने हरवली तर काय करावं? याविषयी सविस्तर जाणून घ्या….

 

अशा प्रकरणांमध्ये सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर नोंदवावा लागेल. तुमचे पेपर्स कुठेतरी हरवले आहेत, हे पोलिसांना सांगावे लागेल. तसेच तुम्ही कुठेतरी ठेवून विसरला असाल आणि आता ते मिळणे अशक्य असेल तरीही एफआयआर दाखल करावा लागेल.
एफआयआर दाखल केल्यानंतर त्याची एक प्रतही आपल्याकडे ठेवावी लागेल. शक्य असल्यास, ही माहिती इंस्पे क्ट र जनरल ऑफ रजिस्ट्रे शन किंवा सब रजिस्ट्रार यांनाही लेखी स्वरूपात देखील दिली जाऊ शकते. या लेखी माहितीमध्ये कागदपत्रांसंबधी परिस्थिती कशी निर्माण झाली हे नक्की सांगा, जेणेकरून त्यांना समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजेल. याशिवाय, वर्तमानपत्रात नोटीसही प्रसिद्ध करावी.

Manganga

मालमत्तेच्या कागदासाठी, स्टॅम्प पेपरवर एक अंडरटेकिंग काढा, ज्यामध्ये मालमत्तेची संपूर्ण माहिती असेल. त्यात हरवलेली कागदपत्रे, एफआयआर आणि वृत्तपत्रातील नोटिसांचा उल्लेख असावा. हे अंडरटेकिंग नोटरीकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्यानंतर ते रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जमा करावे लागेल. तुम्ही हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत असल्यास, तुम्ही रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन किंवा RWA कडून डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट मिळवू शकता.

 

आता तुमच्या मालमत्तेच्या डुप्लिकेट पेपरसाठी तुम्हाला रजिस्ट्रार ऑफिसमध्ये डुप्लिकेट सेल डीडसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला एफआयआरची फोटोकॉपी, वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीची कॉपी, डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट आणि नोटरीने अटेस्टेड केलेले अंडरटेकिंग आणि काही प्रोसेसिंग फीस रजिस्ट्रार ऑफिस जमा करावी लागेल. त्यानंतर तुमच्या नावावर डुप्लिकेट सेल डीड जारी केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!