Latest Marathi News

BREAKING NEWS

 

उरमोडी धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यूदेह सापडला 

0 357

 

 

सातारा : मित्रांसमवेत उरमोडी धरणात पोहायला गेलेल्या सागर महादेव देवकर (वय २१, रा. तारळे, ता. पाटण) याचा आज, सकाळी मृतदेह आढळून आला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर देवकर हा साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिकत होता. मंगळवारी दुपारी वर्गमित्रांसमवेत तो परळी, ता. सातारा येथील उरमोडी धरणाकडे फिरण्यासाठी गेला होता. यावेळी काही मुले उरमोडी धरणात पोहण्यासाठी उतरली. तेव्हा सागरलाही पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याला चांगले पोहता येत होते. तो धरणात उतरल्यानंतर पोहत काही अंतर पुढे गेला. मात्र, त्याला  दम लागला. त्याला परत सुद्धा येता आले नाही. अखेर गटांगळ्या खात तो बुडाला.

 

त्याच्या मित्रांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. परंतु तो दिसेनासा झाला. त्यानंतर मित्रांनी याबाबत माहिती दिली. सातारा तालुका पोलिसांनाही याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही तातडीने घटनास्थळी आले.

 

दुसऱ्या दिवशी आज, बुधवारी सकाळी शोध मोहीम हाती घेण्यात आली. त्यावेळी सागरचा मृतदेह धरणाच्या मधोमध सापडला. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.