फोटोग्राफी प्रसिद्ध असलेल्या Oppo कंपनी लवकरच Oppo Reno 10 Series लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या या सीरिजमध्ये Oppo Reno 10 मॉडेल, Oppo Reno 10 Pro आणि Oppo Reno 10 Pro+ असे तीन स्मार्टफोन असणार आहे. परंतु अशातच Oppo Reno 10 Pro+ च्या स्मार्टफोनचे डिझाईन लीक झाले आहे. 100W चार्जिंग सपोर्टसह हा फोन लवकरच भारतीय बाजारात लवकरच दाखल होणार आहे.
नुकतेच या फोनचे एका पोस्टद्वारे डिझाइन रेंडर शेअर करण्यात आले आहे. शेअर करण्यात आलेल्या मोबाईल हा काळ्या रंगाच्या प्रकारात हँडसेट दर्शवतात. या फोनच्या मागील पॅनलवर एक लंबवर्तुळ कॅमेरा मॉड्यूल देण्यात आले आहे, ज्यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे.

सेल्फी कॅमेर्या साठी डिस्प्लेच्या वरच्या बाजूला सेंटर पंच होल कटआउट असणार आहे.Oppo Reno 10 Pro+ देखील 3C सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसून आला आहे. या सूचीवरून असे दिसून आले आहे की 5G सपोर्ट असणारा हा फोन 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकेल. फोटोग्राफीसाठी, यात 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि आणखी 64-मेगापिक्सेलचा सेन्सर असेल. फ्रंट कॅमेरा 32-मेगापिक्सल सेन्सरने सुसज्ज असेल.