कोल्हापुर : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निकालामध्ये सत्ताधारी महाडिक गटाने पुन्हा एकदा बाजी मारत सत्ता अबाधित राखली आहे. महाडिक गटाने कारखान्याच्या सर्वच्या सर्व 21 जागांवर विजयी घौडदौड सुरु केली आहे. मतमोजणी फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आज रात्री उशिरा अंतिम निकालावर औपचारिक शिक्कामोर्तब होईल.
निवडणुकीमध्ये विरोधी परिवर्तन आघाडीचा पुरता धुव्वा महाडिक आघाडीने उडवला. सर्वच्या सर्व जागांवर महाडिक आघाडीने विजयी घौडतोड सुरू केली आहे. ज्या ताकदीने विरोधी आघाडीकडून प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे महाडिकांच्या सत्तेला सुरूंग लागतो की काय? अशी शंका कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये वर्तविण्यात येत होती. मात्र, पुन्हा एकदा सभासदांनी सत्ताधाऱ्यांवर विश्वास दाखवला आहे. सलग निवडणूक जिंकलेल्या सतेज पाटील यांना दारुण पराभवाचे तोंड पहावं लागलं आहे.
