कोल्हापुर : श्री. क्षेत्र आदमापूर ( ता. भुदरगड ) येथील सदगुरु बाळूमामा देवालय या मंदिराची ट्रस्टी अखेर धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी सोमवारी बरखास्त केली असून तीन सदस्यीय समितीची प्रसारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवराज नाईकवाडे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून सदस्यपदी धर्मादाय निरीक्षक एम. के. नाईक आणि धर्मादाय निरीक्षक सत्यनारायण शेणॉय यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २५) रोजी या समितीने आपला कार्यभार स्वीकारला आहे.
सद्गुरु बाळूमामा देवस्थान समितीच्या अधिकार पदाच्या कारणावरून गेल्या अनेक दिवस समिती सदस्यांमध्ये वाद सुरू होता. या वादाचे पर्यावसन कोल्हापूर येथे झाले होते. यानंतर आपणच देवालयाची अधिकृत ट्रस्टी असे दोन्हीकडून दावे करण्यात आले होते. या दाव्यापूर्वी गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी देवस्थानवर समितीवर आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून विश्वस्त मंडळ बरखास्त केले. जमीन खरेदीचा वाद हे यावेळी उपस्थित करण्यात आला होता. धर्मादाय सहयुक्त आणि धर्मादाय सह आयुक्त बरखास्तीचा बडगा उभारला आहे. विद्यमान ट्रस्टमधील ११ जणांना बरखास्त केल्या असून उर्वरित दोन जणांना कायम ठेवले आहे. मात्र, कामकाजात भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे.

या तीन समितीचे सदस्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आदमापूर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, संभाजी पाटील, दिलीप पाटील, इंद्रजीत खर्डेकर, नामदेव पाटील, एस. पी. पाटील, संदीप कांबळे ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी बाळूमामाच्या मंदिर विकासासाठी व भक्तांच्या सेवेसाठी आपण सहकार्य करू अशी भूमिका यावेळी व्यक्त केली.