Latest Marathi News

BREAKING NEWS

अजिंक्य रहाणेला आयपीएल पावले ! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा

0 657

बीसीसीआयने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघाची कमान पुन्हा एकदा रोहित शर्माच्या हाती असेल, तर अशा अनेक खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या आणि उत्कृष्ट खेळ दाखवणाऱ्या अजिंक्य रहाणेला बीसीसीआयने बक्षीस दिले आहे. त्याला पुन्हा एकदा टीम इंडियाचे तिकीट मिळाले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी तब्बल वर्षभरानंतर अजिंक्य रहाणेचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे मधल्या फळीत जागा रिकामी होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने सूर्यकुमार यादवला स्थान दिलं होतं. पण तो डाव यशस्वी झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निवड समितीने वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणेवरच विश्वास व्यक्त केला आहे.

Manganga

यासोबतच रहाणेला आयपीएलमधील चमकदार कामगिरीचे बक्षीसही मिळाले आहे. अशातच महत्त्वाची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब कामगिरी करूनही सर्वंच्या टीकेचा धनी झालेला केएल राहुलला टीम इंडियातील जागा वाचवण्यात यश आले. निवड समितीने विकेटकीपिंगसाठी केएस भरतवरच विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, मधली फळी आणखी मजबूत करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा केएल राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी देणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव , जयदेव उनाडकट

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!