जत : माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणातील संशयितांना मोका : कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केली कारवाई
सांगली : जत नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खूनात सहभागी असणार्याू मुख्य संशयितांसह पाच जणांवर मोका लावण्यात आला आहे. याबाबतची कारवाई कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केली.
जत येथे माजी नगरसेवक विजय ताड यांच्यावर गोळ्या झाडून तसेच डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला होता. माजी नगरसेवक उमेश सावंत यांच्याकडून सुपारी घेवून तिघांनी हा खून केला होता. पोलिसांनी या खुनात सहभागी असणारे संदीप उर्फ बबलू शंकर चव्हाण, आकाश व्हनखंडे, किरण चव्हाण या तिघांना अटक केली होती. तर मुख्य संशयीत उमेश सावंत अद्याप फरारी आहे.

टोळी प्रमुख संदीप चव्हाण याने वरील सर्व संशयीत व निकेश उर्फ दाद्या मदने याच्या सहाय्याने टोळी निर्माण करून खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी इत्यादी प्रकार केले होते. टोळीची दहशत निर्माण झाल्याने कोल्हापूर विशेष पोलीस निरीक्षक सुनील फुलारी यांनी माजी नगरसेवक उमेश सावंत याच्यासह टोळीला मोका लावला आहे.