Latest Marathi News

BREAKING NEWS

जात पडताळणी विशेष मोहिमेंतर्गत त्रुटी पुर्तता विशेष शिबिराचे आयोजन

0 372

सांगली : ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर करुन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे व समितीने ईमेलद्वारे त्रुटी पुर्तता करण्याबाबत कळविलेले आहे, अशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता 24 ते 28 एप्रिल या कालावधीत “त्रुटी पुर्तता विशेष शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष नंदिनी आवडे यांनी केले आहे.

सन 2023-24 या चालू शैक्षणीक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित असणाऱ्या व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) Common Entrance Test, Joint Entrance Examination (JEE) , National Eligibility Cum Entrance Test (NEET), Graduate Aptitude Test in Engineering (GATE) , National Aptitude Test in Architecture (NATA) तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवी करिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन “सामाजिक न्याय पर्वच्या” अनुषंगाने करण्यात येणार असल्याचे श्रीमती आवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!