माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. २४ एप्रिल २०२३ : निंबवडे : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ६० वर्षीय वृद्धाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नेलकरंजी येथील सुरेश महादेव घाडगे (वय ६०) रा. नेलकरंजी यांनी नेलकरंजी गावाच्या हद्दीत धनाजी घाडगे यांच्या शेतात असलेल्या लिंबाला झाडाला दिनांक २४ रोजी सकाळच्या दरम्यान नायलॉन दोरीने गळफास घेउन आत्महत्या केली.

याप्रकरणी नेलकरंजीचे पोलीस पाटील जगन्नाथ जावीर यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.