माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. २४ एप्रिल २०२३ : निंबवडे : आटपाडी तालुक्यातील निंबवडे गावचे सुपुत्र दिलीप मोटे यांनी माणदेश च्या दुष्काळी जगण्यावर आधारित ‘परिक्रमा माणदेशची’ या पुस्तकाचे लेखन केले असून मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे प्रकाशन आळंदी येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले. या सोहळ्यास मा.आ. अनंतकुमार पाटील, डि.टी.मोटे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी या कादंबरीस शुभेच्छा देताना आणखी जोमाने लिहिण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी बोलताना लेखक दिलीप मोटे यांनी या कादंबरी मधून रामायण महाभारता पासून असलेल्या भूतकाळातील दुष्काळात घडलेले कथानक गुंफले असून यातून माणदेश च्या जनावरे, माती अन माणसांचा संघर्ष मांडला आहे. या कार्यक्रमास कृष्णा रासकर, विद्या तामखडे, शिवदास बिडगर, माऊली हळणवर यांच्यासह निंबवडे गावचे माजी मुख्याध्यापक डि.आर. कुलकर्णी, राजाराम मगदूम, रमेश पिसे, भरत मोटे, नानासाहेब झुरे उपस्थित होते.
