खरसुंडी / वार्ताहर : आटपाडी तालुक्यातील खरसूंडी येथील श्रीमती इंदुबाई नामदेव निचळ (वय.७८) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
स.पो.नि.नागनाथ निचळ, ॲड.निळकंठ निचळ व पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष नंदकुमार निचळ यांच्या त्या मातोश्री होत. श्रीमती निचळ यांचे पश्चात मुले, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी बुधवार दि. २६ रोजी सकाळी ८.०० वाजता खरसूंडी येथे होणार आहे.
