“आपल्या शरीराला साखरेची गरज असते. परंतु, कोणत्याही स्वरूपात अतिरिक्त साखरेची गरज नसते. मुलांच्या वाढीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. आपले शरीर कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. पण , शरीराला सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा, ज्यूस, मिठाई, डेझर्ट आणि कँडीजच्या रूपात अतिरिक्त साखरेची गरज नसते. दुधाचे पदार्थ, प्रक्रिया केलेली पेयं आणि पॅकेज केलेले पदार्थ यामध्ये आढळणाऱ्या साखरेचे जास्त सेवन केल्यानं लठ्ठपणा येऊ शकतो. मधुमेहाचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये, तो नंतर कर्करोग, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल पातळी आणि टाइप २ मधुमेहाचे रूप घेतो,” अशी प्रतिक्रिया मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉ. विशाल परमार यांनी दिली.
काही पालक आपल्या मुलांच्या साखरेच्या सेवनाबाबत काळजी घेतात. प्रश्न असा आहे की दोन वर्षाखालील मुलांना साखरेची गरज आहे का? परमार म्हणतात, “सुरुवातीच्या वर्षांत व्हाईट शुगर देऊ नये. विशेषत: जेव्हा मूल एक वर्षापेक्षा कमी असते. तेव्हा ती अजिबात देऊ नये. साखर जवळजवळ प्रत्येक गोष्टीत असते. कफ सिरप ते ब्रेडमध्येही ती असते. त्यामुळे लहान मुलांना याचा जास्त धोका असतो.

मुलांना आणि प्रौढांना दररोज किती साखर दिली जाऊ शकते हे त्यांचे वय, लिंग, कारण आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असतं. अमेरिकन हार्ट असोसिएशननं साखरेसाठी काही मर्यादा दिल्या आहेत. यानुसार २ ते १८ वर्षे वयोगटातील बालकाला दररोज ६ चमचे साखर दिली जाऊ शकते. हे प्रमाण महिलांसाठी देखील सारखीच आहे. पुरुषांना दररोज ९ चमचेपेक्षा जास्त साखर दिली जाऊ शकत नाही. अशी माहिती गुरुग्राम येथील पारस हेल्थच्या चीफ डायटिशियन नेहा पठानिया यांनी दिली.