Latest Marathi News

BREAKING NEWS

कण्हेर धरणात बुडालेल्या भावी डॉक्टरचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश

0 341

सातारा : कण्हेर, ता. सातारा गावच्या हद्दतील कण्हेर धरणात बुडालेल्या अकलूजच्या भावी डॉक्टर तिसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी धरणात तरंगत असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

 

स्वराज संभाजी माने-देशमुख (वय २३, रा. अकलूज, सध्या रा. मंगळवार पेठ, सातारा) असे मृत भावी डॉक्टरचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय तृतीया व रमजान ईदनिमित्त शनिवार, दि. २२ रोजी सर्व कोलेज व शाळांना सुटी होती. साताऱ्यातील नामांकित मेडिकल कोलेजची दहा मुले कण्हेर धरणात पोहण्यासाठी गेली होती. त्यांच्यासमवेत स्वराज सुद्धा गेला होता. स्वराजला चांगले पोहता येत होते. त्याच्यासह अन्य दोन मुले पोहण्यासाठी धरणात उतरली.

Manganga

 

स्वराज आणि त्याचे दोन मित्र पोहत धरणात दूरवर गेले. धरणाच्या मधोमध गेल्यानंतर तिघेही मुले परत निघाली. मात्र, त्यावेळी स्वराजला दम लागला. तो गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांच्या निदर्शनास आला. परंतु त्यांनाही दम लागल्यामुळे ती दोन्ही मुले कशीबशी धरणाच्या काठावर पोहत आली. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. धरणात मधोमध अंतर खूप असल्यामुळे कोणालाही स्वराजजवळ पोहोचता आले नाही.

 

या प्रकाराची माहिती पोलिसांसह शिवेंद्रसिंहराजेंच्या रेस्क्यू टीमला मिळाल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवशी साडेपाच तास शोध मोहीम राबविली. मात्र, स्वराजचा मृतदेह सापडला नाही. अखेर तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रेस्क्यू टीम धरणाजवळ पोहोचली. त्यावेळी स्वराजचा मृतदेह तरंगत काठावर आला होता. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून स्वराजचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!