Latest Marathi News

BREAKING NEWS

चक्क! डॉक्टर महिलेला घातला सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांचा गंडा

0 249

पुणे : डॉक्टर महिलेला सायबर चोरट्यांनी २३ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ५० वर्षीय डॉक्टर महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manganga

समाजमाध्यमातील जाहिरातीच्या ध्वनिचित्रफितींना दर्शक पसंती मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी संदेशाव्दारे दाखविले होते. चोरट्यांनी महिलेला ‘टास्क’ पूर्ण करण्यास सांगितले होते.

सुरुवातीला डॉक्टर महिलेला काही रक्कम भरण्यास सांगण्यात आले. सायबर चोरट्यांनी आणखी पैसे देण्याचे आमिष त्यांना दाखविले. त्यानंतर त्यांना वेळोवेळी आमिष दाखवून त्यांच्याकडून २३ लाख ८३ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली..

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!