Latest Marathi News

BREAKING NEWS

वरात बघायला गेलेल्या युवकाचा अपघातात जागीच मृत्यू

0 332

कोल्हापूर: आजऱ्यात वरात पाहण्यासाठी जात असताना आजरा पेट्रोल पंपासमोर झालेल्या मोटरसायकलच्या अपघातात विकास महादेव पाटील (वय २० रा. देऊळवाडी ता.भुदरगड) हा युवक जागीच ठार झाला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली.

 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अभिषेक पुतणीस व विकास पाटील हे दोघेही आजऱ्यातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात. रात्री हॉटेलमधील काम संपल्यानंतर ते आपल्याकडील मोटरसायकलने वरात पाहण्यासाठी जात होते. यावेळी समोरून विरुध्द दिशेने आलेल्या मोटरसायकलस्वार जितेंद्र रामचंद्र नवार ( रा.आवंडी वसाहत, ता. आजरा ) याने जोराची धडक दिली. यामध्ये विकास पाटील गाडीवरून रस्त्यावर पडला. त्यांच्या डोकीला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.

Manganga

जखमी दोघांना तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच विकासचा मृत्यू झाला. आज सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!