छत्रपती संभाजीनगर : कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एमजीएम हॉस्पिटलसमोर आज सकाळी साडेदहा वाजता झाला.
ओमकार लक्ष्मण थोरात असे मृत तरुणाचे नाव आहे. तो एमबीए अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत अधिक तपास सुरु आहे.
