सोलापूर : रेल्वेच्या स्वच्छतागृहात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याबाबत रेल्वे पोलिसांनी पंढरपूर पोलिसांना माहिती दिली आहे.
याबाबत पंढरपूर पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, दादर-पंढरपूर फास्ट पॅसेंजर या गाडीच्या बोगी नं.डी-४ च्या स्वच्छतागृहामध्ये एका अनोळखी पुरुषाने प्लॅशर पाईपच्या दांड्याला शर्टाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

या अनोळखी मयत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ वर्षे, उंची ५ फुट ४ इंच, रंगाने गोरा, चेहरा उभट, नाक सरळ, अंगाने सडपातळ, कपाळावर मध्यमागी तीळ, अंगात निळ्या रंगाचा जिन्सचा शर्ट, राखाडी पॅन्ट असलेला अनोळखी पुरुष मयत स्थितीत आढळून आला.
असून, याबाबत संबधितांनी तसेच ओळखीच्या व्यक्तीने पंढरपूर रेल्वे पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे. आवाहन करण्यात आले आहे. याबाबत पंढरपूर पोलिस व रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.