चंद्रकांत महाजन (गुरुजी) यांचा आज सेवापुर्ती गौरव समारंभ : कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे असिफ मुजावर यांचे आवाहन
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागमळी (करगणी) येथे कार्यरत असलेले चंद्रकांत श्रीपाल महाजन (गुरुजी) हे सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा आज शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात (तात्या), शिक्षक उपसंचालक महेश चौथे, शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी यांच्या हस्ते सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न होणार आहे.
सदरच्या कार्यक्रमास शिक्षक नेते धैर्यशील उर्फ शंभू पाटील, माजी सभापती विजयसिंह पाटील, जेष्ठ नेते आण्णासो पत्की, शिक्षक नेते जगन्नाथ कोळपे, विस्तारअधिकारी सर्वश्री मैनाताई गायकवाड, सुरेश हसबे, अर्जुन विभूते, विजय राजमाने, करगणीचे सरपंच गणेश खंदारे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी.जाधव, युवा नेते दत्तात्रय पाटील, माजी सरपंच विजय सरगर, ग्रा.पं.सदस्य भिमराव होनमाने, विठ्ठल होनमाने, एल.के.खिलारी, रासप जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रसिक सपाटे, शरद पाटील, ज्ञानेश्वर खिलारी, श्रीकांत खिलारी, शिक्षक बँकेचे संचालक शरद चव्हाण, संजय कबीर, बिरू मुढे, नितीन गळवे, जगन्नाथ जाधव, शहाजी वाक्षे,यशवंत गोडसे, नारायण कदम, मंगल राजमाने, जनार्दन मोटे, जीवन सावंत, नितीन वाघमारे, शिवाजी गळवे, शिक्षक बँकेचे संचालक सचिन खरमाटे, विश्वास पुजारी, टी.के. जावीर, दत्तात्रय चोथे, अजिनाथ बुधावले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सदरचा कार्यक्रम हा आज दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी ११.३० वा. श्री, मंगल कार्यालय, बनपुरी पाटी भिंगेवाडी येथे संपन्न होणार असून सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष असिफ मुजावर यांनी केले आहे.