Latest Marathi News

BREAKING NEWS

साहील शेख यांची जलसंपदा मध्ये कनिष्ठ अभियंता पदी निवड : शिक्षक समितीकडून सत्कार

0 636

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील धावडवाडी येथील डॉ.आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रुग्णालय लिमिटेड सांगलीचे संचालक बाबासाहेब शेख यांचे चिरंजीव इंजि. साहील बाबासाहेब शेख यांची महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता वर्ग दोन पदी निवड झाल्याबद्दल साहिलचा व त्यांचे पालक बाबासाहेब शेख यांचा यथोचित गौरव आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आला.

यावेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी. जाधव, शिक्षक बँक संचालक सचिन खरमाटे ,विभागीय अध्यक्ष दीपक कुंभार, तालुका नेते शामराव ऐवळे, तालुकाध्यक्ष संजय कबीर, अजय राक्षे, दादासाहेब लोखंडे, भीमराव पाटील, आबासाहेब हातेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Manganga

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!