Latest Marathi News

BREAKING NEWS

विकास कामांच्या माध्यमातुन जनतेसमोर : तानाजीराव पाटील : आटपाडी बाजार समिती निवडणुकीसाठी शिवसेनेची प्रचारात आघाडी

0 1,610

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. २२ एप्रिल २०२३ : आटपाडी तालुक्यात केलेल्या विकास कामांच्या जोरावरच जनतेसमोर जात असून सर्व विरोधक एकत्र आले असून यातच आमचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी केले. आटपाडी बाजार समितीच्या शिवसेनेच्या श्री सिद्धनाथ शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या शुभारंभ प्रसंगी केले.

यावेळी काँग्रेसचे जयदीप भोसले, रासपचे लक्ष्मण सरगर यांच्यासह सर्व उमेदवार मतदार शिवसेना,काँग्रेस, रासप सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना तानाजीराव पाटील म्हणाले, स्वार्थीसाठी एकत्र आलेल्यांना जनतेने ओळखले आहे. मी जिथे जाईल तिथे प्रामाणिक काम करतो. त्यामुळे मार्केट कमिटी आपल्या विचाराची आणूया आणि मार्केट कमिटी अशी असते आणि कशी चालविली जाते हे विरोधकांना दाखवूया.

Manganga

आमच्याकडे असणारे सर्व उमेदवार मी किंवा जयदीप, लक्ष्मण यांनी चुकीचे काही सांगितले तर ते आम्हाला जाणीव करून देतील, परंतु विरोधकांचे उमेदवार हे आण्णांनी हात वर करा म्हंटल्यावर दोन्ही हात वर करतील अशी टीका केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!