आटपाडी/प्रतिनिधी : राज्यातील भूविकास बँकेचे शेतकऱ्यांची कर्जे माफ केली असून, ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ वर बँकेची कर्जे नोंद आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी कर्जाचा बोजा कमी करून घ्यावा असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ. उन्मेष देशमुख यांनी केले आहे.
डॉ. उन्मेष देशमुख पुढे बोलताना म्हणाले, सांगली जिल्ह्यातील १४०१ शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असून थकीत कर्जाची रक्कम शासनाने माफ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ७/१२ वरती भूविकास बँकेचा बोजा नोंद आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी त्या-त्या भागातील तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना भेटून नोंदी रद्द करून ७/१२ कोरा करून घ्यावा.

७/१२ वर असणाऱ्या नोंदी रद्द करून घेतल्यास भविष्यात कर्ज घेताना शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे डॉ. उन्मेष देशमुख म्हणाले.
काय म्हणाले डॉ. उन्मेष देशमुख पहा व्हिडीओ