Latest Marathi News

BREAKING NEWS

लहानपणीच ‘इतकी’ गोंडस दिसणारी गौतमी पाटीलचा लहानपणीचा फोटो व्हायरल

0 2,526

गौतमीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नृत्याची आवड जपत गौतमीने सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. गौतमी हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

एवढंच नाही तर मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणून देखील गौतमीने स्वतःची ओळख तयार केली आहे. मात्र लहान असताना गौतमी कशी दिसायची असा प्रश्न चाहत्यांना नक्कीच पडला असणार. गौतमी पाटीलचा लहान असतानाचा एक फोटो समोर आला आहे.

Manganga

गौतमी पाटीलचा लहानपणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता अख्ख मार्केट जाम करणारी गौतमी लहानपणीही तितकीच गोंडस दिसत होती. आतापर्यंत तुम्ही गौतमीला लावणी करताना साडीमध्ये पाहिलं असेल, मात्र या फोटोमध्ये गौतमी ही एका जांभळ्या रंगाच्या जाळीदार ड्रेसमध्ये दिसत आहे. विना मेकअपही गौतमी तेवढीच सुंदर दिसत आहे. गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती.

 

दरम्यान अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी केली. आणि तिला तिथे पाचशे रुपये मानधन मिळालं होतं. यानंतर गौतमीने या क्षेत्रात भविष्य घडवायचं ठरवलं. आणि इथूनच गौतमीचा खरा प्रवास सुरु झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!