VIDEO : अर्शदीप सिंगकडून दोनदा स्टम्पचे तुकडे, स्टंपच्या किंमती वाचून व्हाल अवाक् , स्टंपच्या किंमती एवढा पगार अजिंक्य रहाणेला देखील मिळत नाही…
ILP 2023 : आयपीएलमध्ये शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात पंजाबच्या अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात दोन विकेट घेत मुंबईच्या तोंडचा घास काढून घेतला. अर्शदीपच्या दोन सलग चेंडूवर दोन स्टम्पचे तुकडे पडले. पण त्याचा आयपीएलला सुद्धा मोठा आर्थिक फटका बसला आहे. मुळातच एलईडी असलेल्या स्टम्प अत्यंत महागड्या आहेत.
आयपीएलमध्ये एलईडी स्टम्प वापरल्या जात असलेल्या या एलईडी स्टम्पच्या एका सेटची किंमत 25 ते 35 लाखांच्या दरम्यान आहे. अर्शदीपने दोन चेंडूंवर बॅक टू बॅक तुकडे केल्याने आयपीएलला किमान 50 ते 70 लाखांचे नुकसान झाले आहे. एवढा पगार स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेला देखील मिळत नाही. सामन्याच्या शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने तिलक वर्माची पहिल्यांदा स्टम्प गुल केली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर नेहल वढेराचा त्याच मार्गाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या सामन्यात पंजाबने मुंबईचा 13 धावांनी पराभव केला.

पहा व्हिडीओ