Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी : फरार असलेल्या “वारीस दे पंजाब” संघटनेच्या प्रमुखाच्या मुसक्या आवळल्या ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0 451

वारीस दे पंजाबचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक, 36 दिवसांपासून फरार अमृतपाल सिंहला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या 36 दिवसांपासून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत फरार असलेला अमृतपाल सिंह अखेर शरण आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतपाल सिंह याने शनिवारी रात्री उशिरा मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मोगा गुरुद्वारा येथून त्याने आत्मसमर्पण केले.

अमृतपाल सिंह हा वारीस पंजाब दे चा प्रमुख आणि खलिस्तानचा समर्थक आहे. अमृतपालने 23 फेब्रुवारीला अजनाला पोलिस ठाण्यावर आपल्या जवळच्या साथीदाराला सोडविण्यासाठी हजारों समर्थकांसह हल्ला चढवला. या हल्ल्यात 6 पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. लवप्रीत तूफान या आपल्या साथीदाराला सोडवण्यासाठी त्याने आपल्या समर्थकांसह तलवार-लाठ्या घेऊन पोलिस ठाण्यावर धाबा बोलला होता.

Manganga

पंजाब पोलिसांनी 18 मार्चपासून अमृतपालला अटक करण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले होते. मात्र, प्रत्येक वेळा त्याने पोलिसांना चकवा दिला. त्यानंतर त्याने पोलिसांना उघड-उघड आव्हान दिले होते. एका व्हिडिओतून त्याने म्हटले होते की वाहे गुरुंच्या इच्छेशिवाय मला अटक करणे शक्य नाही. मध्यंतरी अमृतपाल गोरखपूर मार्गे नेपाळला पळाल्याच्या बातम्या देखील होत्या. दरम्यान, पंजाब हरियाणा कोर्टाने सुद्धा अमृतपालला पकडण्यात आलेल्या अपयशावरून पंजाब पोलिसांना फटकारले होते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!