माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. 22 एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील शेटफळ येथे अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपयांचा शेटनेट कागदासह कटर मशीनची चोरी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सतीश आप्पासो गायकवाड वय ४२ यांची शेटफळे येथे शेती आहे. त्यांनी त्यांच्या शेतातील मळ्यामध्ये असणाऱ्या खोलीमध्ये शेडनेट कागद, ग्रास कटर मशीन, बागेसाठी लागणारे लिक्वीड खताची पोती तसेच सेंटक्स पाण्याची टाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

सदर घटनेबाबत सतीश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.