माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. 22 एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी शुक ओढ्यावरती असणाऱ्या पुलावर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आवळाई येथील राजेंद्र किसन हेगडे वय ५० यांनी त्यांची हिरो होंडा सीडी डिलक्स ही दुचाकी (MH42C7497) आटपाडी शुक ओढ्यावरती असणाऱ्या पुलावर लावलेली होती. परंतु या ठिकाणहून अज्ञात चोरट्यांनी ती लंपास केली आहे.

याबाबत राजेंद्र हेगडे यांनी आटपाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.